आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात लघुसिंचन योजनांसाठी ५० कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विदर्भात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेला वादळी वारा आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या शेतीकरीता राज्य सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांकरीता राज्य सरकारने ६४ कोटी रूपयांचा विशेष निधी मदत मंजूर केला आहे. शेतकऱ्यांना मदत देणाऱ्या शासन निर्णयाची अधिसुचना २० सप्टेंबर रोजी प्रसूत करण्यात आली. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार मंजूर करण्यात आलेला मदतनिधी थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत म्हंटले आहे.

विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे संत्रा, हरभरा, गहू आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यात केळी, संत्रा, पपई आदी फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त तालुक्याचे सर्वेक्षणही केले होते. परंतु तब्बल नऊ महिने उलटूनही गारपीटग्रस्तांना मदत मिळू शकली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी संताप व्यक्त केला जाता होता. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे शासनाने नुकतीच २० सप्टेबर रोजी विदर्भातील ८४ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६४ कोटी रुपयांच्या मदतीसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांनी ही मदत लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
पुढे वाचा... मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
बातम्या आणखी आहेत...