आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तव्यावर गैरहजर; तब्बल 56 सफाई कामगारांचे कापले वेतन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कर्तव्यावर अनुपस्थित आढळून आलेल्या ५६ सफाई कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई आयुक्त हेमंत पवार यांच्याकडून आज (२९ ऑगस्ट) करण्यात आली. सफाई कामगार, बिट प्युन, आरोग्य निरीक्षक यांची तपासणी करण्याकरीता नियुक्त २२ अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली.
 
शहरात साफसफाईचा बोजवारा वाजल्याने पदाधिकाऱ्यांकडून चांगलीच नाराजी व्यक्त करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता आरोग्य विभागावर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्तांकडून २२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आज सकाळी 7 ते ८.३० दरम्यान या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर तब्बल ५६ कर्मचारी अनुपस्थित आढळून आले. तब्बल ५६ कर्मचारी कर्तव्यावर नसल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करण्यात आली. 

यामध्ये ललीता अनिल चावरे (निलंबित), सोनम सुरेश पंडीत (निलंबित), कमल तंबोले (निलंबित), रिता जैदे, शितल सारसर, अजय सिरसीया, दिलीप चावरे, अरुण सिरसीया, सोनू आठवले, मयूर सारसर, दिपक विनोद पोगसे, मिथून सिरसीया, सुधीर जैदे, भिम सुखदेव डेंडुले, संदीप रवी सारसर, राहुल रंजित हडाले, सुरेंद्र संतु संगले, संजय ढेंडवाल, दिपक चंडाले, विक्की फकीर टांक, संदीप लक्ष्मण बालगोहर, पवन रवी निंधाणे, मिना रंजीत हडाले, रवी चावरे, अर्जुन पोगसे, राजकुमार लाखन चव्हाण, अनुप मोतीलाल डुलगज, रवी भिकु सारसर, सिमा टोपे, शिला संगेले, चिमण इतवारी गोहर, उमा मनोज समुद्रे, अनिल मंगल खराटे, श्याम चव्हाण, लिला सुरेश नखलाल, आकाश चावरे, राहुल ढोके, जयराम सुरज भूसम, तुलसी निंधाने, संजय कन्हैया चावरे, ज्योती अोंकार सिरसीया, राजेश पुनम सारवान, अलका अरुण हडाले, अंकुश मनोज ढोके, काजल प्रकाश मार्वे, ममता भारत चंडाल, विनोद निंधाने, रितेश निधांने, सुनिता गोपाल डागोर, सविता सुभाष काकडे, सुभाष चावरे, अनुप गोपाल संकते, ओंकार कालू निंदाणे, लक्ष्मी कादली, निलेश सारसर, राजू चावरे यांचा समावेश आहे. 
बातम्या आणखी आहेत...