आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर मतदारसंघ: डॉ. रणजीत पाटील, संजय खोडके यांच्यात झाली लढत, जिल्ह्यात 59 टक्के मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधानपरिषदेच्या एका जागेकरिता झालेल्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यात शुक्रवारी ५९.९४ टक्के एवढी मतदानाची नोंद झाली. यात ३० हजार ८५ पुरूष मतदारांनी तर १५ हजार ८८२ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

शुक्रवारी फेब्रुवारीला सकाळी ते या वेळेत झालेले मतदान शांततेत झाले. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच जिल्ह्यात ७६ हजार ६८६ मतदारांची नोंद करण्यात आली होता. या निवडणुकीमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ रणजीत पाटील आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्या उमेदवारीमुळे ही लढत अत्यंत चुरशीची झाली. निवडणुकीतील मतदानाच्या सुरवातीला भारतीय जनता पक्षाच्या बाजूने या निवडणुकीचे एकतर्फी पारडे जड झाले असे चित्र दिसत असतानाच कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार संजय खोडके यांनी भारतीय जनता पक्षाच्या डॉ. रणजीत पाटील यांना चांगलीच लढत दिली आहे. तर ‘प्रहार संघटने’च्या वतीने डॉ. दीपक धोटे आणि अपक्ष उमेदवार डॉ. अविनाश चौधरी यांनी या निवडणुकीत रंगत आणली. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सामना रंगला होता असे सार्वत्रिक चित्र दिसून आले. जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी उत्साहात मतदान केले. काही मतदान केंद्रामध्ये तर रांगा लागल्या होत्या. निवडणुक लढवणाऱ्या १३ ही उमेदवारांचे भाग्य शुक्रवारी मतपेटीमध्ये बंद झाले आहे. येत्या तारखेला सोमवारी निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. 

यांच्या ‘राजकीय भाग्या’चा फैसला होणार सहा फेब्रुवारीला 
डॉ.रणजित विठठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), संजय विनायक खोडके (इंडियन नॅशनल काँग्रेस), दिलीप यादवराव सुरोशे (प्राउटिस्ट ब्लॉक इंडिया), निता रामसिंह गहरवाल (रिपब्लिकन सेना), ॲड.अरूण ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर (अपक्ष), डॉ.अविनाश चौधरी (अपक्ष), गणेश जानकीराम तायडे (अपक्ष), ॲड.संतोष नारायणराव गावंडे (अपक्ष), जितेंद्र एन. जैन (अपक्ष), प्रा.डॉ.दीपक शेषराव धोटे (अपक्ष), ॲड.डॉ.प्रा.देशमुख लतीश कृष्णराव (अपक्ष), प्रशांत प्रल्हादराव काटे (अपक्ष), प्रा.प्रशांत मधुसूदन वानखेडे (अपक्ष). 

जिल्ह्यात ९१ केंद्रावर मतदान: पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या अमरावतीसह चिखलदरा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, तिवसा, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या १४ ही तालुक्यातील ९१ मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदान घेण्यात आले. विभागात सर्वाधिक ९१ मतदान केंद्र अमरावती जिल्ह्यात होते.त्यापैकी ५१ मतदान केंद्र अमरावती शहरात होते. मतदारांना सुलभतेसाठी मतदान केंद्राच्या इमारती बाहेर प्रशासनाच्या वतीने मतदार सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आले होते. मतदाराला त्याचे नाव, मतदार यादी मधला अनुक्रमांक मतदार केंद्राचे नाव पत्ता शोधून देण्यासाठी शासनाद्वारे सहकार्य केले.  
बातम्या आणखी आहेत...