आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गन पॉइंटवर मण्णपुरम गोल्डचे 30 Kg सोने लुटले, सुरक्षारक्षक असतानाही दिवसाढवळ्या दरोडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत बंदुकीच्या धाकावर सहा जणांनी दरोडा घालून तब्बल ९ कोटींचे ३१ किलो सोने लुटले. - Divya Marathi
मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत बंदुकीच्या धाकावर सहा जणांनी दरोडा घालून तब्बल ९ कोटींचे ३१ किलो सोने लुटले.
नागपूर - केवळ दोन हजारांसाठी वयोवृद्ध महिलेचा खून केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दिवसाढवळ्या नागपुरातील जरीपटका येथील मणप्पुरम गोल्ड लोनच्या शाखेत बंदुकीच्या धाकावर सहा जणांनी दरोडा घालून तब्बल ९ कोटींचे ३१ किलो सोने लुटल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

जरीपटका येथे मणप्पुरम गोल्डची शाखा आहे. घटना घडली त्या वेळी तेथे तैनात सुरक्षा रक्षक ड्यूटीवर होता. तरीही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना चित्रीत झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. तपासाच्या दृष्टीने पोलिसांना काही सुगावा मिळाल्याचे समजते. याबाबत माहिती मिळताच पोलिस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत आरोपींचा मार्ग काढण्यासाठी पथके रवाना केली.
बातम्या आणखी आहेत...