आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या सहा विद्यार्थ्यांकडून चोरीच्या पाच दुचाकी केल्या जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्टंटबाजीकरणाऱ्या चार दुचाकीस्वारांना रविवारी (दि. १७) राजापेठ पोलिसांनी पकडले होते. यापैकी तिघे अल्पवयीन आहे. यांच्याकडून पोलिसांनी दोन महागड्या दुचाकी, एक कार जप्त केली. हे तिन्ही वाहन घेण्यापूर्वी या चौकडीने शासकीय विभागात कार्यरत एका वर्ग च्या अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल पाच लाख रुपये चोरले होते. याच रकमेतून त्यांनी ही वाहन खरेदी केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
शहरातील मार्गावरून भरधाव दुचाकी चालवून स्टंटबाजी करून वाहन चालवणाऱ्या युवकांच्या टोळ्या शहरात मागील काही महिन्यांपासून सक्रिय झाल्या आहेत. स्टंटबाजी करणाऱ्या या युवकांच्या टोळीने सध्या शहरात हैदोस घातला आहे. यापैकीच एक टोळी रविवारी राजापेठ पोलिसांनी पकडली. या वेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले होते. तिघे अल्पवयीन रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यापूर्वी त्याला फ्रेजरपुरा पोलिसांनी मागील वर्षी दुचाकी चोरीमध्ये अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून "आरवन फाइव्ह', पल्सर २०० स्पोर्ट या महागड्या दुचाकी आणि लान्सर कार जप्त केली आहे. या दुचाकींची किंमत प्रत्येकी लाख ३५ हजार रुपये आहे. पोलिसांनी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांनाही माहिती दिली. त्या वेळी मुलांकडे दुचाकी असल्याचे आम्हाला आताच माहीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांना या चौकडीवर संशय आला. तसेच जप्त केलेल्या कारच्या डिक्कीमधून घरफोडीसारख्या कुरापती करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मोठ्या प्रमाणात मिळून आले. त्या आधारे पोलिसांच्या संशयाला वाव मिळाला होता. दरम्यान, चौघांची चौकशी केली. या चौकडीने सात ते आठ महिन्यांपूर्वी शहरातच राहणाऱ्या शासकीय विभागातील एका वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्याच्या घरात चोरी करून तब्बल पाच लाखांची रोख चोरली होती. सदर चोरी करून मिळालेल्या रकमेतून या चौकडीने आरवन फाइव्ह, पल्सर २०० स्पोर्ट या लाखाे रुपयांच्या नव्या कोऱ्या दुचाकी खरेदी केल्या. तसेच एक लान्सर कार खरेदी केली. या चोरी प्रकरणात संबंधित शासकीय अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली नाही, त्यामुळे या चोरीबाबत पोलिसांकडेही नोंद नाही. दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर तपास करणारे पोलिसही चक्रावले आहे. ही कार खरेदी करणाऱ्याने ज्या व्यक्तीकडून कार खरेदी केली, त्याला लाख रुपये दिले आहे, मात्र उर्वरित रक्कम देणे बाकी आहे. त्यामुळे ही कार सध्या त्याच व्यक्तीच्या नावावर आहे. पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच तीन अल्पवयींना तपासासाठी पोलिसांना गरज वाटेल त्या वेळी हजर राहण्याच्या अटीवर नोटीस देऊन रविवारी रात्री पालकांच्या ताब्यात दिले होते. त्यांना साेमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते.

पाचवेळा बदलवला रंग : याचौकडीने जुनी कार खरेदी केली. त्या कारचा मूळ रंग बदलवून आतापर्यंत किमान पाच वेळा रंग बदलवला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चौकशीत गुन्हे उघड होण्याची शक्यता
^राजापेठ पोलिसांनी रविवारी पकडलेल्या चौकडीपैकी तिघे अल्पवयीन असल्यामुळे त्यांना रविवारी रात्री पालकांच्या ताब्यात दिले. एकाला आम्ही अटक केली असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याकडून चौकशीमध्ये चोरी किंवा घरफोडीचे अनेक गुन्हे उघड होऊ शकतात. त्यांच्याकडे असलेले वाहन जप्त केले आहे. सोमनाथ घार्गे, पोलिसउपायुक्त.

चोरीच्या पैशातून महागड्या दुचाकींसह आलिशान कार फिरवणाऱ्या तीन अल्पवयीनांसह चौघांना राजापेठ पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर शहरातील नामांकित शाळांमध्ये दहाव्या वर्गात शिकणाऱ्या सहा विद्यार्थ्यांकडून कोतवाली पोलिसांनी सोमवारी (दि.१८)चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.

सोमवारी दुपारी एका व्यक्तीने दुचाकी चोरट्यांबाबत पोलिसांना माहिती देऊन दोघांना कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांची चौकशी केली असता या अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश झाला असून, त्यांच्याकडून आणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे.

जुन्या कॉटन मार्केट भागातून मो. रफिक सुभान या व्यावसायिकाची दुचाकी (क्रमांक एमएच २७ वाय ५५०२) जानेवारी २०१६ ला चोरीला गेली होती. दरम्यान, सोमवारी मो. रफिक हे मित्रासोबत देशमुख लॉन भागातून येत असताना त्यांना एक अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी पाहिले असता त्यांची चोरी गेलेली दुचाकी त्या ठिकाणी होती. त्यांनी तातडीने पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मो. रफिक यांनी पकडून ठेवलेल्या दोघांना ताब्यात घेतले.ते दोन्ही दहावीचे विद्यार्थी आहेत. या दोघांनी आणखी सात मित्रांची नावे सांगून आम्ही अनेक दुचाकी चोरल्याचेही सांगितले. त्यामुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आणखी चार जणांना पकडून आणले. तेसुद्धा सर्व दहावीत शिकणारे आहेत. पोलिसांनी सायंकाळपर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या असून दोन दुचाकी या प्रतापी विद्यार्थ्यांनी नागपूर मार्गावरील 'फन अँड फूड'जवळ लपवून ठेवल्याचे सांगितले.

पार्किंगमध्ये लपवून ठेवायचे चोरीच्या दुचाकी
दहावीत शिकणारे हे 'लिटील थेप' घरातून सायकलने शाळेत जाण्यासाठी निघायचे, दरम्यान शहरातील सहकार भुवन परिसरातील गुलशन मार्केटच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी घेऊन दिवसभर शाळेत जाणे किंवा मौजमस्ती करत फिरत होते. या पार्किंगसह इतर काही ठिकाणीसुद्धा हे चोरटे दुचाकी उभी करून घरी जात होते. कारण दुचाकी घेऊन घरी गेले तर कुटुंबीयांना या प्रतापाबाबत माहिती मिळेल, अशी भीती त्यांना होती.