Home »Maharashtra »Vidarva »Nagpur» 6 Month Old Child Body Found, Mother Missing

गोंदियातील बाग नदीत आई वाहून गेली, 6 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला

प्रतिनिधी | Jul 17, 2017, 18:05 PM IST

  • 6 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह सापडला आहे.
गोंदिया - येथील आमगांव तालुक्यातील बाग नदीत बुडाल्याने एका अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई सुद्धा पाण्यात वाहून गेली. संबंधित बाळाचा मृतदेह सापडला असून वाहून गेलेल्या आईचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहून गेलेल्या आईचे नाव दुर्गा खनोज भगत असे आहे. ती आपल्या 6 महिन्यांच्या बाळासोबत जात असतानाच वाहून गेली. हे मायलेक ढीवरटोला सावंगी येथील राहिवासी होते. त्यांचा पाय घसरला, कुणी धक्का दिला अथवा इतर काही कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. विशेष म्हणजे, गोंदियात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील आमगांव व सालेकसा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरूच आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहणे आणि इतरत्र स्थलांतर होण्याचे निर्देश दिले आहेत.

Next Article

Recommended