आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षीय भाच्याचे अपहरण; सहा तासांत काढले शोधून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या एका सहा वर्षीय बालकाचे बुधवारी दुपारी वाजताच्या सुमारास अपहरण झाले होते. या बालकाच्या अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन गाडगेनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बालकाला अमरावतीत आणले. या बालकाचे अपहरण मामा त्याच्या मित्रानेच केल्याचे उघड झाल्यामुळे पोलिसांनी मामाला अटक केली आहे.


तन्मय उमेश आठवले (६) असे अपहरण झालेल्या बालकाचेे नाव आहे, तर रुपेश ऊर्फ अक्षय सहदेव थोरात (२४, रा. वडाळा, चांदूर बाजार) असे पोलिसांनी अटक केलेल्या तन्मयच्या मामाचे नाव आहे. याचवेळी अपहरण करताना रुपेश सोबत असलेला त्याचा मित्र पसार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे. तन्मयच्या आई वडिलांचे पटत नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून तन्मयची आई वडाळा येथे माहेरी राहते, तर तन्मय वडिलांकडे राहतो.


बुधवारी सायंकाळी तन्मय घराच्या परिसरात खेळत असताना अचानक तो गायब झाला. काही वेळानंतर त्याच्या आजीला तो दिसला नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली. या प्रकरणी तन्मयची आजी लता आठवले यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्याचवेळी चार लहान मुलींनी सांगितले की, एका दुचाकीवर दोन व्यक्ती आले होते. त्यांनी तन्मयला कबुतर दाखवतो, असे म्हणून सोबत नेले. इतकाच काय तो, अपहरणकर्त्यांचा सुगावा गाडगेनगर पोलिसांकडे होता. या माहितीच्या आधारे गाडगे नगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी एक पथक चांदूर बाजार जवळ असलेल्या वडाळा गावात रवाना केले. रात्री १२ वाजताच्या सुमारास तन्मय त्याच्या मामाच्या घरी असल्याचे पोलिसांना माहीत झाले. त्यामुळे तन्मयसह त्याच्या मामाला पोलिसांनी अटक करून शहरात आणले. तसेच रुपेशचा सहकारी पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अवघ्या सहा तासांत गाडगेनगर पोलिसांनी बालकाचा शोध घेऊन अपकरणकर्त्याला अटक केली. शहरात सद्या सुरू असलेल्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता पोलिस अधिक दक्ष झाले. तरीही अपहरणामुळे पोलिसांसोबत नागरिकांनाही धक्का बसला होता. मात्र बालकाचा शोध लागताच सर्वांनी समाधान व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...