आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दलघमी साठा; ६० कोटी रुपये खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सातवर्षांपासून रखडलेल्या अकोला तालुक्यातील कंचनपूर बृहत प्रकल्पाच्या खर्चापेक्षा, पुनर्वसन, भूसंपादनासह विविध बाबींवर होणारा खर्च आणि प्रत्यक्षात होणारा फायदा लक्षात घेऊन या प्रकल्पाची प्रशासकीय मंजुरी रद्द करण्याची मागणी अकोला पाटबंधारे विभागाने शासनाकडे केली आहे. सर्व बाजूने एकूण होणाऱ्या खर्चानुसार एक दलघमी पाणी साठवण्यासाठी प्रत्यक्षात ६० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अकोला तालुक्यातील एका नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला २००९ ला प्रशासकीय मंजुरी मिळाली. या प्रकल्पामुळे ४४५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. यास शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे, तर दुसरीकडे पुनर्वसन आराखड्याची रखडलेली मंजुरी, सुधारित प्रशासकीय मान्यता आदी सर्व कारणांमुळे सात वर्ष लोटूनही या प्रकल्पाच्या कामास प्रारंभ झालेला नाही. ७.४३ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण आणि १११२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणाऱ्या या प्रकल्पासाठी अंदाजे ४५० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे.

३९ कोटींचे झाले १४० कोटी
कंचनपूरप्रकल्पाला २००९ ला प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्या वेळी ३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, सात वर्ष लोटूनही विविध कारणांमुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यामुळे आज केवळ या प्रकल्पाच्या कामासाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पुनर्वसन,भूसंपादनावर खर्च अधिक
प्रकल्पासाठी४४५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. पुनर्वसन, बाधित कुटुंबांना मदत, पर्यायी गावठाण, जुने गावठाण आदींवर ३१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुनर्वसन प्रकल्पाच्या बांधकामाचा एकूण खर्च त्यामुळेच ४५० कोटींवर पोहोचला आहे.