आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात 60 टक्के पेरण्या पूर्ण; मात्र पावसाने मारली दडी, शेतकऱ्यांना चिंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - मृगनक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही जिल्ह्यातील ६० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शेतकरी चिंतेतच असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असे असले तरी काही तालुक्यात पडलेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी दिल्याचे चित्र आहे.
 
यंदा सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा बऱ्यापैकी पाऊस पडेल, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या लागवडीला सुरूवात केली होती. मात्र, पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. बहुतांश तालुक्यात सुरूवातीच्या काळात दमदार पाऊस झाला, परंतू मध्यंतरी पावसाची उसंत टेन्शन देणारीच ठरली.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्या करताना थोडा हात आखडता घेतला होता. मागील आठवड्यापासून शहरास जिल्हाभरात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. वातावरणातील उकाडा कमी झाल्याचेही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग दिसून आली. जिल्ह्यात यंदा लाख हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होईल, असा अंदाज आहे. आज घडीस लाख हेक्टर म्हणजे साधारणत: ६० टक्के पेरण्या आटोपल्याचे आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. यात कापूस लाख १५ हजार हेक्टर, सोयाबीन एक लाख १३ हजार हेक्टर, तूर ६५ हजार हेक्टर पिके मिळून ६० टक्के पेरण्या आटोपल्याचे सांगण्यात येत आहे. आता नियमित पाऊस असणे गरजेचे आहे. त्याशिवाय पिक जिवंत राहू शकत नाही. असे असले तरी जिल्हाभरात पावसाची हजेरी असल्याचे दिसून आले. सोमवारी सुरू असलेल्या पावसाने मध्यरात्रीपर्यंत उसंत घेतलीच नव्हती. २७ जून रोजी आभाळ स्वच्छ होते, परंतू सायंकाळी ढगाने आभाळात गर्दी केली होती. त्यामुळे मध्यरात्री पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
कर्जाचे टेन्शन अद्याप जैसे थे
सध्याबँकांच्या तिजोरीमध्ये ठणठणाट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आली आहे. पेरण्यासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा खरेदी करण्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे कर्जमाफी जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आताही टेन्शनच दिसून येत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...