आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरहून हैदराबादेत कत्‍तलीसाठी जात होती 63 जनावरे, युवकांनी केली सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- नागपूरवरुन हैदराबाद येथे जनावारंची कत्‍तलीसाठी वाहतूक करणारे 2 ट्रक युवकांनी पकडले असून, यातून तब्‍बल 63 जनावरांची सुटका करण्‍यात आली आहे. युवकांनी ट्रकचा चालक आणि मालकाला पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले आहे. विदर्भातून हैद्राबाद येथे जनावरांची तस्करी होत असते. अशा अनेक घटना यापूर्वीही समोर आल्‍या आहेत. गेल्‍या काही दिवसांपासून गोवंश हत्याबंदी असल्याने जनावरांची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. विविध शक्‍कली करुन तस्‍कर जनावरांची ट्रकव्‍दारे वाहतूक करतात.
24 तास ठेवले लक्ष..
यासंदर्भात युवकांनी पोलिसांवरही काही आरोप केले आहेत. तस्‍करांशी आर्थिक संबंध ठेऊन संबंधातून हजारो जनावरे कत्तलखान्याकडे पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तालुक्यातील जय कालिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे ट्रक पकडले आहेत. युवकांनी स्वतःच 24 तास पाळत ठेऊन नागपूरहून हैद्राबादकडे जनावरांना घेऊन जाणारे ट्रक पकडले.
चोरट्या मार्गाने होते वाहतूक..
नागपूरहून हैदराबादला यवतमाळमार्गे जात असताना रस्त्यात पारवा, घाटंजी, दिग्रस, पिंपळखुटी इत्यादी चेकपोस्ट येतात. मात्र, या चेकपोस्टपासून वाचून चोरट्या मार्गाने जनावरांची तस्‍करी करणारे वाहने जात असतात. त्यामुळे यावर कठोर उपाय योजना करण्याची मागणी जय कालिका मंडळाने केली आहे. सुटका केलेल्या जनावरांना पोलिसांनी चैतन्य गोरक्षण संस्थेच्या दिले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...