आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 64 हजार शाळाबाह्य मुले, राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात माहिती सादर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, सर्वेक्षणानुसार राज्यात तब्बल ६४ हजार शाळाबाह्य मुले आढळून आली असून, ती ६ ते १४ वयोगटातील आहेत, अशी माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली.
 
राज्यातील शाळाबाह्य मुलांसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले असल्याचा दावा याचिकेत केला आहे. या याचिकेवर आतापर्यंत पाच ते सहा वेळा सुनावणी झाली असून, या दरम्यान राज्य सरकारने ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांची माहिती न्यायालयात सादर केली आहे. या सर्वेक्षणानुसार या वयोगटातील जवळपास ६४ हजार शाळाबाह्य मुले राज्यात आढळल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. फिरदोस मिर्झा यांनी न्यायालयात सांगितले की, केवळ ६ ते १४ वयोगटातील सर्वेक्षणातून शाळाबाह्य मुलांचे चित्र स्पष्ट होत नाही. त्यासाठी ३ ते ६ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. न्यायालयाने त्याबाबत सहमती दर्शवित ३ ते ६ वयोगटातील शाळाबाह्य मुलांची माहिती सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. नागपूर महानगर पालिकेने यापूर्वीच या वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरू केले असल्याची माहिती न्यायालयात दिली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...