आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या मृत्यूप्रकरणी सात वर्षे कारावास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- राळेगावपोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वनोजा येथे हातपंपावर पाणी भरत असताना एका तरुणाला दुसऱ्याने मारहाण केली. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीला वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा सत्र न्यायाधीश डी. आर. सिरासाव यांनी गुरूवारी दुपारी हा निर्णय दिला आहे.
स्वप्निल बबनराव शेंडे वय २१ वर्ष रा. वनोजा तालुका राळेगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सविस्तर असे की, दि. ऑगष्ट २०१३ रोजी वनोजा येथील मृतक तरूण नानाजी जागो टेकाम वय ३० वर्ष हे पाणी भरण्यासाठी गावातील स्वप्नील शेंडे याच्या घराजवळील हातपंपावर गेले होते. दरम्यान नानाजी यांनी स्वप्नील शेंडे याला तुझा शेणखतामुळे हातपंपाचे पाणी खराब येत आहे. असे म्हटले, असता स्वप्नील शेंडे याने नानाजी यांच्या डोक्यावर लाकडी काठीने मारहाण केली. यावेळी नानाजी टेकाम हे बेशुद्ध अवस्थेत हातपंपाजवळ पडून असल्याचे पाहून त्यांचे पुतणेे पंकज निलेश यांनी नानाजीला तत्काळ राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान डॉक्टरांनी यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. दि. ऑगष्ट २०१३ रोजी यवतमाळ येथे आणत असताना वाटेतच नानाजी टेकाम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी स्वप्नील बबनराव शेंडे याला अटक केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकूण दहा साक्षी तपासण्यात आल्या. त्यात आरोपी स्वप्नील शेंडे याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. आर. सिरासाव यांनी आरोपी स्वप्नील शेंडे याला वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन दवे यांनी बाजू मांडली.

उपचारादरम्यान झाला मृत्यू
याप्रकरणातील आरोप मृतक यांच्यामध्ये फारसा वाद नव्हताच मात्र क्षुल्लक वादानेच यातील एका तरुणाचा बळी घेऊन दुसऱ्याला कारावासाची हवा खावी लागत आहे. लाकडाने मारहाण केल्यानंतर जखमी झालेल्या मृतक नानाजी टेकाम यांना सावंगीमेघेपर्यंत उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.