आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७५ विद्यार्थ्यांचा तीन वर्षांत अपघाती मृत्यू, विम्याची रक्कम मात्र एकालाही मिळाली नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यात २०१२ ते २०१५ या तीन वर्षांमध्ये ७५ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला असून, एकाही विद्यार्थ्याच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळालेली नाही. या योजनेचे शासनाकडे ५६ लाख ५५ हजार रुपये थकित असून, ते तातडीने देण्याची मागणी विद्यार्थी स्वाभिमानने केली आहे. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीला घेऊन उपशिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत यांना शुक्रवारी (५ अॉगस्ट) निवेदन देण्यात आले.

शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शासनाकडून विमा भरला जातो. जेणे करुन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या परिवाराला नुकसान भरपाई म्हणून ७५ हजार रुपयांची रक्कम दिली जाते. मात्र तीन ते चार वर्षांपासून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेपासून एकाही लाभार्थ्याला लाभ मिळालेला नाही. प्रशासन या विषयावर गंभीर नसल्याचे विद्यार्थी स्वाभिमानचे म्हणणे आहे. राज्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पालकानंतर शिक्षण विभागाची आहे. थकीत असलेली विद्यार्थी अपघात विम्याची रक्कम तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. दहा दिवसांत हा प्रश्न निकाली काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी अनुप अग्रवाल, अभिजित देशमुख, अंकुश ठाकरे, गौतम हिरे, मंगेश कोकाटे, प्रतीक मोटघरे, विकास घाटे, सत्यम राऊत, अनिकेत देशमुख, आकाश राजगुरे, अक्षय कोटवे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
उपशिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत यांना निवेदन देताना पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...