आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेळघाटव्यतिरिक्त जिल्ह्यातील वन्यजीवांकरिता ८० पाणवठे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मेळघाटव्याघ्र प्रकल्प आणि बफर झोनमध्ये असलेल्या वन्यजीवांव्यतिरिक्त अमरावती जिल्ह्यातही वन्यजीव संवर्धनात लक्षणीय वाढ होत आहे. अमरावती शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर पोहराच्या जंगलामध्ये बिबट, हरीण, सांबर, काळवीट यांची संख्या बघता वन्यजीवांना जंगलातच पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्याकरिता वन विभागाने युद्धस्तरावर पावले उचलली आहेत. या वर्षी पर्जमान्य घसरल्याने जंगलात वन्यप्राण्यांकरिता पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे वन्यप्राणी शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याअभावी वन्यप्राण्यांना गावाशेजारी भटकावे लागू नये म्हणून अमरावती वन विभागाच्या वतीने कृत्रिम ४६ आणि नैसर्गिक ३४ असे एकूण ८० पाणवठ्यांची दुरुस्ती आणि खोलीकरण केले. या पाणवठ्यांद्वारे वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपवन संरक्षक नीनू सोमराज यांनी दिली .
सोमराज यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रातील वन जमिनीवर वडाळी येथे ९, परतवाडा २७, चांदूर रेल्वे १४, वरुड ८, मोर्शी २२ असे एकूण कृत्रिम नैसर्गिक ८० पाणवठे आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांची दुरुस्ती खोलीकरण करून तसेच काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना गावाशेजारी भटकावे लागणार नाही याची दक्षता उपवनसंरक्षक अमरावती वन विभागाकडून घेण्यात येत आहे. एकूण ४६ कृत्रिम पाणवठ्यांतर्गत कूपनलिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी कूपनलिकेवर हातपंप कूपनलिकेवर सोलर पंप बसवण्यात आले आहे. तसेच विहिरीवरून सुद्धा मोटरपंपाद्वारे पाणवठ्यात पाणी सोडून वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे.

चांदूररेल्वे पोहरा या जंगलामध्ये १२ बिबट असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. यापैकी तीन बिबट एकाच वेळी नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी पिण्याकरिता एकत्रित आले होते. इतर जंगलातही वन्यजीव वाढत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.
बातम्या आणखी आहेत...