आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय बास्केटबाॅल स्पर्धेत ८०० खेळाडूंचा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येत्या २४ सप्टेंबरपासून शहरात आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबाॅल स्पर्धेत राज्याच्या आठ महसूल विभागातील ८०० खेळाडुंचा सहभाग राहणार आहे. शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालय, तसेच जिल्हा क्रीडा परिषद अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ही स्पर्धा २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या बास्केटबाॅल कोर्टवर रंगणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी विभागीय क्रीडा संकुल सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
एकूण ६२४ खेळाडू, संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक, सामनाधिकारी, पंच निवड समिती सदस्य याप्रमाणे एकूण ८०० खेळाडू स्पर्धक १४, १७ १९ वर्षांखालील मुले मुलींच्या गटात जेतेपदासाठी झुंजणार आहेत. विभागीय क्रीडा संकुलात २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार अाहे. गृह राज्यमंत्री डाॅ. रणजीत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण गित्ते राहतील. याप्रसंगी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार रामदास तडस, महापौर चरणजीत कौर नंदा, जि.प.अध्यक्ष सतीश उईके, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार डाॅ. सुनील देशमुख, विरेंद्र जगताप, ओमप्रकाश (बच्चू) कडू, डाॅ. अनिल बोंडे, अॅड. यशोमती ठाकूर, रवि राणा, रमेश बुंदिले, प्रभूदास भिलावेकर उपस्थित राहणार आहेतअसल्याचे परदेशी यांनी सांिगतले. याप्रसंगी क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र राज्य बास्केटबाॅल संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख, क्रीडा अधिकारी राज्य क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.

पारदर्शकनिर्णयासाठी विशेष तांत्रिक समिती : छत्रपतीपुरस्कार विजेते मुकुंद धस, जिल्हा संघटनेचे सचिव जयंत देशमुख, शत्रूघ्न गोखले यांच्या मार्गदर्शनात इतर पंचांचा विशेष तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने राष्ट्रीय स्पर्धेत ितन्ही वयोगटात प्रथम तीन क्रमांकांमध्ये स्थान कायम ठेवले असून मुलांच्या संघांनी पहिल्या सहा क्रमांकांमध्ये स्थान पटकावल्याची माहिती संघटनेच्या उपाध्यक्षांनी दिली.

आंतरराष्ट्रीय खेळाडू येणार : यास्पर्धेत १९ वर्षांखालील गटात ऋतूजा पवार, स्मृती शेरगिल, शरद कोकाटे, श्रेया दांडेकर हे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. अमरावती विभागातील सहा संघ या स्पर्धेत सहभागी होतील. त्यापैकी पाच संघ जिल्ह्यातील तर एक संघ बुलडाण्याचा आहे.
बातम्या आणखी आहेत...