आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनासह सव्वा नऊ लाखांचा गुटखा जप्त, अचलपूर पोलिसांची नाकाबंदीदरम्यान कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चांदूरबाजारकडून परतवाडा, अचलपूरच्या दिशेने येणाऱ्या एका वाहनात गुटखा येत असल्याची माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून अचलपूरजवळ सदर वाहन थांबवले. या वाहनातून पोलिसांनी लाख ३९ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला तसेच लाख रुपयांचे वाहन जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १८) करण्यात आली आहे.

चांदूर बाजारकडून येणाऱ्या टाटा २०७ या मालवाहू वाहनात (क्रमांक एम. एच. २२ ए.ए. १६०५) मोठ्या प्रमाणात गुटखा, पानमसाला अचलपूर आणि परतवाडा शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना गोपनिय सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे अचलपूरचे ठाणेदार नरेन्द्र ठाकरे यांनी अचलपूर ते चांदूर बाजार मार्गावर नाकाबंदी लावली. सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
बातम्या आणखी आहेत...