आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाख रुपयांची लाच; जीएसटी उपायुक्त अटकेत,अमरावती कार्यालयात सीबीआयची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- व्यावसायिकाकडून दीड लाखाचीलाच घेताना केंद्रीय जीएसटीच्या उपायुक्ताला (आयआरएस) गुरुवारी सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अमरावतीच्या सीजीएसटी कार्यालयात ही कारवाई झाली. मुकुल तेलगोटे (३२, अमरावती) असे अाराेपीचे नाव अाहे. एका बड्या व्यावसायिकाची फाइल अमरावती सीजीएसटी विभागीय कार्यालयात प्रलंबित होती. तक्रारदार व्यापाऱ्याने वारंवार हे काम करण्यासाठी या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र ही फाइल निकालात काढण्याचा मोबदला म्हणून तेलगोटे यांनी पैशाची मागणी केली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...