आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर मनपाच्या शहर बससेवेचे कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर; प्रवाशांचे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सर्वसामान्यांची हक्काची स्टार बस आजपासून ठप्प आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने हा संप पुकारला आहे. त्यामुळे नागपुरातील साधारण 350 पेक्षा जास्त बसेस आज ठप्प आहेत. स्टार बससेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठे हाल होत आहेत. महापालिका बस कर्मचाऱ्यांच्या संपाला परवानगी नाही, असे पत्र राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे.

 

 

उद्यापासून बारावीची परिक्षा सुरू होत आहे. त्यातच बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. संघटनेने संप पुकारू नये, यासाठी नागपूर महापालिकेचे परिवहन सभापती बंटी कुकटे यांनी प्रयत्न केले, पण संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आजपासून नागपुरात स्टार बससेवा ठप्प झाली आहे.

 


स्टार बस ही नागपूरकरांच्या प्रवासाचे हक्काचे साधन आहे. रोज 28 हजार विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागपूरकर मिळून दीड लाखांच्या वर प्रवासी स्टार बसमधून प्रवास करतात. 123 मार्गावर रोज स्टार बस प्रवाशांची वाहतूक करते. या प्रवासांना संपाचा फटका बसणार आहे. संपावर जाणाऱ्या स्टारबसच्या चालक आणि वाहकांपासून प्रवाशांना धोका होऊ नये, किंवा परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी महानगरपालिकेने आज पोलिसांची मदत घेतली आहे.

किमान वेतन मिळावे, बस ऑपरेटर्स आणि कंडक्टर्स एजन्सीची चौकशी करावी, काढण्यात आलेल्यांना सामावून घ्यावे, मनपाने स्वत: बससेवा चालवावी, सर्व चालक आणि वाहकांना नोकरीत स्थायी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी स्टार बस चालक व वाहकांनी संप पुकारला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

 

बातम्या आणखी आहेत...