आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ लिपिकास मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हे, प्राचार्यांची तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आदिवासी विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या लिपिकास मारहाण करणाऱ्या युवकांविरोधात गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जनता कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य अमर घारफडकर यांच्या तक्रारीनुसार गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेकडून या प्रकरणाची चौकशी करण्याकरता समिती नेमण्यात आली आहे.

 

अमोल पाटील, नीलेश भेंडे, अरविंद येवले, उपेंद्र बछले, चेतन बाळापुरे, वसंत वाघमारे, दीपक पडाेळे, राजीव गोरले, कैलाश घोरपडे, प्रवीण आठवले, संजय बेलकर असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या युवकांची नावे आहे. प्राचार्य घारफडकर यांच्या तक्रारीनंतर मंगळवारी (९ जानेवारी) रात्री १० वाजता युवकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. जनता कृषी तंत्र विद्यालयाचा लिपिक बाबा इंगळे याने ९० टक्के गुण मिळवून देतो तसेच शिष्यवृत्ती माफ करण्याचे आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करीत आदिवासी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना समोर आली.


रविवार जानेवारीला घडलेल्या या प्रकाराबाबत गाडगेनगर ठाण्यात जानेवारीला दुपारी तक्रार दाखल करण्यात आली. तत्पूर्वी काही युवकांनी जनता कृषी विद्यालयात प्रवेश करीत लिपिक बाबा इंगळे यास मारहाण करीत गाडगेनगर पोलिस ठाण्यात आणले. या मारहाणीत लिपिक जखमी देखील झाला आहे. घारफडकर यांच्या तक्रारीनुसार युवकांनी विद्यालयात घुसून कार्यालयातील साहित्याची तोडफोड करीत कर्मचारी बाबुलाल इंगळे शिपाई राजेंद्र बांबल याला मारहाण केल्याचे नमूद आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी ११ युवकांविरोधात भांदविच्या ४५२, ३२३, ४२७, १४३ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

 

चौकशी समिती नेमली : जनता कृषी तंत्र विद्यालयात घडलेल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्याकडून दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. अध्यक्ष देशमुख यांनी विद्यालयाला भेट देत पाहणी केली. दोन सदस्यीय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

 

दुसरा अटकेत तिसरा फरार
विद्यार्थिनीकडून दिलेल्या तक्रारीत तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मंगळवारला ताब्यात घेतलेला बाबुलाल इंगळे रुग्णालयात उपचार घेत अाहे. शिपाई राजेंद्र बांबल याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विल्हेकर अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.

बातम्या आणखी आहेत...