आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हाड म्हणाले, तुकोबांचा खून झाला होता! संतांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने वारकरी संतापले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गीतेचा श्लोक म्हणण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची काल कॅमेऱ्यासमोर गोची झाली. त्यानंतर आता आणखी एका वादात जितेंद्र आव्हाड अडकल्याचे दिसतेय. जितेंद्र आव्हाड यांनी फेसबूक लाइव्हमध्ये बोलताना तुकाराम महाराजांचा खून झाला होता असे वक्तव्य केले. तसेच त्यांनी यानंतर बोलताना भिडेवर टीका करताना संतांच्या नावांचा एकेरी उल्लेखही केला. यामुळे वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त होत आहे. 


काय म्हणाले आव्हाड...
आव्हाड या फेसबूक लाइव्हमध्ये भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर टीका करत होते. भिडे यांनी तुकोबा आणि ज्ञानोबांपेक्षा मनु एक पाऊल पुढे असल्याचे म्हटले होते. याबाबत बोलताना आव्हाड यांनी तुकाराम महाराजांचा खून झाला होता असा उल्लेख केला. त्याचबरोबर संत मनुपेक्षा महान होते हे सांगण्यासाठी बोलताना ओघात त्यांनी संतांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे या मुद्द्यावरून आता आणखी एक वाद सुरू झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी संतांचा अपमान केला असल्याची ओरड सुरू झाली आहे. 


वारकऱ्यांचा संताप का..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वारकऱ्यांनी मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तुकोबांचा खून झाला होता या वक्तव्यावर वारकऱ्यांचा आक्षेप आहे. तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठात गेले होते. कोणाला हे मान्य नसेल किंवा या मतावर मतभेद असतील तर त्या लोकांनी किमान इतर वक्तव्ये करू नये असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच संतांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यावरूनही संताप व्यक्त होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...