आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर पुन्हा हादरले..भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अलिकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे 'क्राईम कॅपीटल' अशी नवी ओळख मिळालेल्या नागपूरकरांची सोमवारची (ता.11) पहाट रक्तरंजीत ठरली. भाजपाचे कार्यकर्ते कमलाकर पवन यांच्या कुटुंबातील पाच जणांची रविवारी मध्यरात्री सशस्र हल्लेखोरांनी निर्घृण हत्त्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही थरकाप उडवणारी घटना नागपुरातील दिघोरी आराधना नगर येथे घडली आहे.

 

कमलाकर पवनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये लहान मुले व वृद्ध महिलेचा समावेश आहे. या हत्याकांडात  भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर (51), त्यांची पत्नी वंदना पवनकर (40)  मुलगी वेदांती पवनकर (12) आणि आई मीराबाई पवनकर (72) यांची  निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर कमलाकर यांचा दोन वर्षाचा भाचा कृष्णा पालटकर याचीही क्रुर हत्या करण्यात आली आहे. कमलाकर पवन यांची लहान मुलगी मिताली व भाची वैष्णवी दुसऱ्या खोलीत झोपलेल्या असल्यामुळे वाचल्या.

 

घटनास्थळी बळजबरी केल्याच्या, मारहाणीच्या वा लुटपाटीच्या कोणत्याही खुणा आढळून न आल्यामुळे हत्त्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचा पोलिसांचा कयास आहे.

 

शेतजमिनीच्या वादातून हत्त्या करण्यात आली का या दिशेनेही पोलिस तपास करीत आहे. या हत्याकांडामुळे नागपूरकर प्रंचड हादरले आहेत. कमलाकर पवनकर यांचा प्रॉपर्टीचा व्यवसाय असून ही हत्या संपत्तीच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे. कमलाकर पवनकर यांची 10 एकर जमीन असून त्यावरुन त्यांच्यात आणि नातेवाईकांमध्ये वाद सुरु होता, अशीही माहिती मिळत आहे. त्यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु आहे.

 

घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे निष्पन्न होत नसल्याने कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने हत्या केली असल्याचाही संशय आहे. पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. संशयित आरोपीच्या शोधासाठी नऊ पथके स्थापन करण्यात आली आहेत. कमलाकर पवनकर हे भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...