आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छातीतून भळाभळा रक्त वाहत असतानाही नि:शस्त्र अवस्थेत त्याने लावले चार माओवाद्यांना पळवून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मत्तामींवर सध्या नागपूर येथील ओसीएचआरआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. - Divya Marathi
मत्तामींवर सध्या नागपूर येथील ओसीएचआरआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या सी-60 कमांडो पोलिस नाईक गोमजी मत्तामी यांच्या छातीतून भळाभळा रक्त वाहत असतानाही 4 नक्षलवाद्यांना पळवून लावले. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी हल्ला केला तेव्हा मत्तामी नि:शस्त्र होते. रविवारी गडचिरोली जिल्ह्यातील इटापल्ली तालुक्यातल्या जांबिया गट्टा येथे मत्तामींचा सामना चार नक्षलवाद्यांशी झाला. नक्षलवाद्यांनी आपल्याकडून हिसकावलेली बंदूक मत्तामींनी परत घेतली आणि नक्षलवाद्यांनी पळ काढला. मत्तामींच्या या शौर्याचे पोलिस दलात कौतुक होत आहे. 

 


मत्तामी 2006 मध्ये पोलिस दलात दाखल झाले. तेव्हापासून ते अनेकदा नक्षलवाद्यांशी भिडले आहेत. पण रविवारी मत्तामींनी नक्षलवाद्यांचा निडरपणे सामनाच केला नाही तर जखमी अवस्थेतही आपली एके-47 रायफल नक्षलवाद्यांकडून पुन्हा हिसकावून घेतली. छातीवर जखम झालेली असतानाही मत्तामी नक्षलवाद्यांचा पाठलाग करत राहिले.

 

 

मत्तामी यांच्यावर हल्ला केलेल्या नक्षलवाद्यांपैकी एकाने त्यांच्यावर पिस्तुल रोखले होते. पण त्याचे पिस्तुल अडकले म्हणून मत्तामी बचावले. अन्यथा त्यांच्या जीवावरच बेतले होते. आठवडा बाजारातून ते आपल्या पोलिस पोस्टकडे परतत होते, तेव्हा साध्या वेशातल्या माओवाद्यांच्या एका चमूने त्यांना चारही बाजूंनी घेरले. मत्तामींची बाकीची टीम पुढे निघून गेली होती. आपल्या एका सहकाऱ्याला भेटायला मत्तामी बाजारात थांबले होते. 

 


गोमजी मत्तामी सांगत होते, 'मला काही कळण्याच्या आतच नक्षलवाद्यांनी माझा डावा हात पकडून मला जमीनीवर पाडले आणि चारही बाजूंनी घेरले. त्यातल्या एकाने बंदुकीचा ट्रिगर दाबला पण फायर न झाल्याने मी बचावलो. हे सगळे इतके पटकन झालं की मला काही कळले नाही. मला त्यांनी जखमी केले. माझी एके-47 हिसकावून घेतली आणि पळू लागले. पण मी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्याशी भिडलो.' 

 


या भागात नक्षलवाद्यांच्या तुकड्या पोलिसांवर असे अचानक हल्ले करतात आणि त्यांची शस्त्रे हिसकावून घेतात. पण मत्तामींशी लढताना नक्षलवाद्यांनाच आपली बंदूक आणि दहा काडतुसे सोडून पळ काढावा लागला. मत्तामींवर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...