आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लार्कने सुट्टीच्या दिवशी तरुणीला एकटीला बोलवले कॉलेजमध्ये, त्यानंतर केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतप्त जमावाने क्लार्कला कॉलेजच्या बाहेर काढुन त्याला भर रस्त्यात चपलेने चोप दिला. - Divya Marathi
संतप्त जमावाने क्लार्कला कॉलेजच्या बाहेर काढुन त्याला भर रस्त्यात चपलेने चोप दिला.

मुंबई/अमरावती- पास करण्याचे आमिष दाखवत एक मुलीला कॉलेजमध्ये बोलवून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार अमरावतीत घडला. मुलीने घरी ही माहिती सांगितल्यावर संतापलेल्या नागरिकांनी असा प्रकार करणाऱ्या क्लार्कला चपलांनी चोप दिला. पोलिसांनी मुलीच्या फिर्यादीवरुन क्लार्कसह कॉलेजच्या अन्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका शिक्षकाचाही समावेश आहे. 

 

 

काय आहे पूर्ण प्रकरण
- मेळघाटात राहणारी ही विद्यार्थिनी जनता कृषी महाविद्यालयात शिकते. 
- क्लार्क बाबा इंगळे याने तिला परिक्षेचा अर्ज भरण्याच्या बहाण्याने रविवारी कॉलेजमध्ये बोलवले. त्याने तिला फी माफ करण्याचे व परिक्षेत 90 टक्के गुण मिळवुन देण्याचे आमिष दाखवले व तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याने तिचा विनयभंग करण्याची प्रयत्न केला. ही विद्यार्थिनी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घरी गेली. दोन दिवस गप्प राहिल्यावर तिने अखेर घरच्यांना सर्व हकिकत सांगितली. 

 

क्लार्कला चोप
- या क्लार्कला चोप देण्यात आल्यावर तो आपले तोंड लपवत होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात कलम 354, 354 (A) आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. एका शिक्षकांवर आणि शिपायांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...