आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कागदपत्रांवर सहीसह नाव, पद, हुद्दा आणि कार्यालयाचा उल्लेख अनिवार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - सरकारी कार्यालयांत कागदपत्रांवर सही मारून ती पुढे सरकवली जातात किंवा आपल्याला परत दिली जातात. त्यामुळे नेमक्या कोणत्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी केली, त्याचे पद आणि हुद्दा काय आहे, याविषयी काहीही समजत नाही. परंतु, यापुढे सरकारी बाबू आणि अधिकाऱ्यांना असे करता येणार नाही.

 

सहीसोबतच संबंधित कागदावर त्यांना   त्यांचे नाव, पद, हुद्दा आणि कार्यालयाचा स्पष्टपणे उल्लेख करावा लागणार आहे. नगरविकास विभागाने परिपत्रकाद्वारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी एका प्रकरणात दिलेल्या निकालात ही बाब स्पष्ट करत सरकारी बाबू आणि अधिकाऱ्यांनी आपले नाव, पद, हुद्दा आणि कार्यालय स्पष्टपणे लिहिण्याच्या सूचना दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...