आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सत्तेवर आल्यास देशाचे नुकसान : आमदार जिग्नेश मेवाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- २०१९ मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचे प्रचंड नुकसान होईल, असा इशारा देताना भाजपला मत न देण्याची शपथ आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दलित बांधवांना देणार आहोत, अशी घोषणा गुजरातमधील नेते व आमदार जिग्नेश मेवाणी यांनी नागपुरात बोलताना केली. 


रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने मंगळवारी नागपुरात मानवाधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना मेवाणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अतिशय तीव्र स्वरुपाची टीका केली. आपण जिवंत असेपर्यंत दलितांची मते भाजपला मिळू देणार नाही, असेही ते म्हणाले. २०१९ मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचा सत्यानाश होईल, असा इशारा देताना मेवाणी म्हणाले की, भाजपची हिंमत वाढून ते देशातील व्यक्तीस्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत. देशाचे संविधान नष्ट करून त्यांना मनुस्मृती आणायची आहे. त्यामुळे भाजपला मतदान करू नका, असे आवाहन आपण राजस्थान आणि महाराष्ट्रातील दलितांना करणार आहोत. आपल्या हयातील भाजपला दलितांची मते मिळू देणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी हे सुरक्षा रक्षक नाहीत. त्यांची सातत्याने देशाची फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...