आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोलीत पोलिसांनी दोन दिवसांत ३७ नक्षलवादी टिपले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यात कसनासूर-बोरिया भागात गेल्या दोन दिवसांतील चकमकींत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या ३७ झाली आहे. इंद्रावती नदीत आणखी १५ नक्षलींचे मृतदेह सापडले. सुरक्षा दलास आलेले हे अभूतपूर्व यश मानले जात आहे.


कसनासूर-बोरिया जंगलात सुरक्षा दलाचे ‘सी-६०’ पथक व केंद्रीय राखीव पोलिस दलाशी चकमकीत हे नक्षली ठार झाले. सुरुवातीला १६ मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. मात्र, या घटनास्थळाजवळच इंद्रावती नदीच्या पात्रात सोमवारी काही मृतदेह तरंगत असल्याचे लक्षात आले. मंगळवारी सकाळपर्यंत नदीपात्रातून ४ महिलांसह १५ नक्षलवाद्यांचे कुजलेले मृतदेह हाती लागले. अहेरी तालुक्यात राजाराम खांदला परिसरात सोमवारी सायंकाळी चकमकीत आणखी ६ नक्षली मारले गेले. यातील काहींची ओळख पटली आहे. यात जिल्हास्तरीय समितीचा सदस्य वासुदेव ऊर्फ नंदू आत्रामसह कार्तिक उईके, जयशिला गावडे, व लता वड्डे यांचा समावेश आहे. मंगळवारी हे सर्व मृतदेह गडचिरोलीत आणले गेले. 

 

बेसावध अवस्थेतच गाठून केला खात्मा 

चकमकीत ठार नक्षलींचे मृतदेह इंद्रावती नदीत असे तरंगत होते. घटनास्थळी साध्या १२ बोअरच्या बंदुकांची काडतुसे सापडली. त्यामुळे पोलिसांनी नक्षलींना बेसावध अवस्थेतच गाठल्याचे दिसते. 

 

बातम्या आणखी आहेत...