आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी बारा जणांवर आरोपपत्र दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नागपूर- विदर्भातील सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील घोटाळ्यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाच तत्कालीन अधिकाऱ्यांसह एकूण १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.   


आरोपपत्र दाखल झालेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांत विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र शिर्के, मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता उमाशंकर पर्वते, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन जिभकाटे, अधीक्षक अभियंता दिलीप पोहेकर तसेच या घोटाळ्यात सहभागी भागीदार कंत्राटदार कंपनी आर.जे. शहा अँड कंपनी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. च्या कालिंदी शहा, तेजस्विनी शहा, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, रमेशकुमार सोनी या कंपनीच्या संचालक व आममुखत्यारपत्रधारकांचा समावेश आहे. मंगळवारी विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या साडेचार हजार पानांच्या आरोपपत्रात एसीबीने महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे निविदांचे अद्ययावतीकरण करून कंत्राटदार कंपनीला ५६ कोटी ५७ लाखांचे कंत्राट मिळवून दिल्याचे नमूद केले आहे. अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या पूर्वानुभव प्रमाणपत्राचीही छाननी केली नाही.   

 

नियमबाह्य सवलती दिल्या

निविदा अर्ज छाननी समितीतील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास नियमबाह्य सवलती देऊन अपात्र कंत्राटदारास पात्र ठरवल्याचा ठपकाही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तर कंत्राटदार कंपनीने पूर्वानुभवाचे बनावट प्रमाणपत्र सादर केले. महामंडळांतर्गत अन्य कुठेही काम सुरू नसल्याचे बनावट प्रमाणपत्र कंपन्यांनी सादर केले. 

बातम्या आणखी आहेत...