आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- जम्मू-काश्मीरच्या सद्य:परिस्थितीला पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जबाबदार असून शत्रूचा नि:पात करण्यासाठी शक्ती आणि बुद्धीचा वापर करावा लागेल. तोडफोड करणाऱ्यांना स्थानिकांमध्ये ती आपली संपत्ती असल्याची भावना रुजवण्याची गरज असून त्यासाठी सरकारलाही तसे व्हावे लागेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात व्यक्त केले.
जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरच्या वतीने वतीने नागपुरात आजपासून सुरू झालेल्या सप्तसिंधू जम्मू, काश्मीर, लडाख महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. भागवत म्हणाले, इराणपासून ते श्रीलंकेपर्यंतच्या प्रदेशाचा डीएनए एकच आहे. ४० हजार वर्षांपासूनचे आपले नाते आहे. ही आपण विसरलो आणि विदेशी शक्तीच्या कपटबुद्धीला बळी पडलो. एकतेचे महत्त्व ताकदीने सांगीतले असते तर आपण विस्कटलो गेलो नसतो. त्याचाच लाभ आज सूडबुद्धीने ग्रासलेला शत्रू घेत आहे. दगड फेकणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्यास भाग पाडणे, ही आपल्या अस्तित्वाची विस्मृती आहे़ आपल्या कर उत्पन्नातून ही संपत्ती निर्माण होतेय, ही जाणिव जेव्हा होईल तेव्हाच एकतेचा शुद्ध भाव निर्माण होईल, असे भागवत यावेळी म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.