आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम विवाहानंतर चर्चेसाठी गेलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला; 10 जणांविरुद्ध गुन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नमुन्यात राहणाऱ्या एका युवकाने अंबागेटच्या आतमध्ये राहणाऱ्या एका युवतीसोबत प्रेमविवाह केला. त्यानंतर मुलीकडील एका ओळखीच्या युवकाला मुलाकडील एकाने चर्चेसाठी बोलावले. त्यामुळे हा युवक मध्यस्थीसाठी गेला असता त्याच्यावर १० जणांनी प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार सातखिराडी येथे १ मार्चला रात्री ८ वाजता घडला. तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी दहापैकी चार जणांना अटक केली आणि एका अल्पवयीनाला नोटीसवर सोडले आहे. भूपेंद्र ठाकूर (३५, रा. अमरावती) असे जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पवन केशरवानी, योगेश केशरवानी, संतोष केशरवानी, रोहित दीपक धोटे या चौघांसह एका अल्पवयीनाला अटक केली, तर पाच जण अजूनही पसार आहेत. 


नमुन्यात राहणाऱ्या एका युवकाने प्रेमविवाह केल्यानंतर १ मार्चला रात्री पवन केशरवानी याने भूपेंद्र ठाकूर यांना फोन करून बोलावले होते. भूपेंद्र ठाकूरची मुलीच्या कुटुंबीयासोबत तसेच केशरवानीसोबत ओळख आहे. त्यामुळे ठाकूर त्यांचा मित्र अजय रामचंद्र यादव (३२) यांच्यासह दुचाकीने १ मार्चला रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास सातखिराडीमध्ये पोहोचले. त्यावेळी भूपेंद्र यांच्यावर पवन केशरवानी व अन्य आठ ते नऊ जणांनी फरशा, लोखंडी रॉड, चाकूसारख्या शस्त्रांनी वार केला तसेच लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत भूपेंद्र ठाकूर यांना रुग्णालयात दाखल केले. 

बातम्या आणखी आहेत...