आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरमध्ये हिंगणा येथे शिवसैनिकांची बस चालकाला मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यशवंत स्टेडियमजवळील डेपोमधून पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर काढल्या जात असतानाच हिंगणा येथे शिवसैनिकांची बस चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भारतीय कामगार सेनेने संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मेस्माविरोधात कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. संपकारी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून 17 चालक-मालकांना बडतर्फ करण्यात आले आहे.

 


नागपूर महापालिकेच्या आपली बस सेवेचे चालक आणि वाहक संपावर आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत. मेस्मा लागू झाल्यानंतर अनेक चालक आणि वाहक आज सकाळी डेपोत पोहोचले. दरम्यान भारतीय कामगार सेनेचे नेते संपावर ठाम आहेत. दरम्यान पोलिसांनी बस सेवेत आडकाठी करणाऱ्या आणि संपावर ठाम असलेल्या संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेणे सुरु केले आहे. आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. महापालिका बस सेवेच्या चालक वाहकांच्या संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे आज सकाळी हाल झाले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 
बातम्या आणखी आहेत...