आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेचे माजी सदस्य रामभाऊ तुपे यांचा शोकप्रस्ताव तीन वर्षांनंतर; मुख्यमंत्री नाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधानसभेचे माजी सदस्य रामभाऊ दशरथ तुपे यांच्या निधनावर शोकप्रस्ताव तब्बल तीन ते साडेतीन वर्षांनंतर साेमवारी विधानसभेत मांडला गेला. या प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली, तर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.   

 

राज्याचे माजी मंत्री गोविंदराव सरनायक, विधानसभेचे माजी सदस्य राजीव राजळे, संपतराव पाटील, मुसा अली मोडक, रामभाऊ तुपे, डॉ. शंकरराव बोबडे, डॉ. कुसुमताई कोरपे या दिवंगत सदस्यांना विधानसभेत साेमवारी आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, अजित पवार, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, भास्कर जाधव, स्मिता कोल्हे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. यापैकी रामभाऊ दशरथ तुपे यांचे निधन २०१४ मध्येच झाले आहे. शोकप्रस्ताव एवढ्या विलंबाने येण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त करीत संबंधितांवर कारवाई करण्याचे आवाहन विधानसभाध्यक्षांना केले. त्यावर विधानसभाध्यक्ष बागडे यांनीही हा गंभीर प्रकार असल्याचे सांगताना या प्रकरणाची चौकशी करूनच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. माजी सदस्य राजीव राजळे यांचे अल्पवयातील निधन अतिशय चटका लावणारे होते, अशा भावना सर्वच सदस्यांनी या वेळी व्यक्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...