आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यातील वाळू घोटाळ्याबाबत 2 दिवसांत निर्णय; माफियांवर मोक्का लावण्याचे सरकारचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- जालना जिल्ह्यातील वाळू घोटाळ्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येऊन संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात दिलेल्या ठेक्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा केल्या जात असल्याची लक्षवेधी विनायक मेटे यांनी उपस्थित केला होता. यासाठी जबाबदार तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मेटे यांनी केली.   


या प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी पूर्ण झाली आहे. त्यात सकृतदर्शनी घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले, तर ते मॅटमध्ये धाव घेऊन परत येतात. यात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...