आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोलीत पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईत अभूतपूर्व यशाने गडचिरोलीत तैनात जवनांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण असताना राज्य राखीव दलात कार्यरत एका पोलिस उपनिरीक्षकाने कार्यालयातच त्याच्याकडील बंदुकीतून स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. राजेंद्र इंगळे (वय ५३) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. गडचिरोली पोलिस मुख्यालयाशेजारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या वस्तीत ही घटना घडली. राजेंद्र इंगळे हे गडचिरोली येथे राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ४ मध्ये कार्यरत होते.

 

एसआरपीचे कार्यालय पोलिस वसाहतीत असून, आजूबाजूला अनेक पोलिस अधिकारी व जवान वास्तव्य करतात.शनिवारी इंगळे कर्तव्यावर असताना त्यांनी आपल्या बंदुकीतून हनुवटीवर गोळी घातली. ही गोळी डोक्यातून बाहेर आली. यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. अमरावती येथील रहिवासी असलेले इंगळे हे दोन महिन्यापूर्वी गावाला गेले होते. यापूर्वी आशा घटना घडलेल्या आहेत. कामाचा ताण अथवा सुट्या न मिळाल्याच्या करणापायी आत्महत्या झाल्या आहेत. उपनिरीक्षक इंगळे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय हे स्पष्ट झालेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...