आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुन्ना यादव लपलाय भाजप नगरसेवकाच्या फार्म हाऊसवर; विखे-पाटलांचा गौप्यस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर पोलिस मागील दोन महिन्यांपासून मुन्ना यादवचा शोध घेत आहे. तो कसा पोलिसांना मिळत नाही, तो नागपूरपासून 22 किलोमीटर अंतरावर भाजपचे नगरसेवक विक्की कुकरेजा याच्या फार्म हाऊसवर लपून बसला आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात केला.

 

मुन्ना यादवविरूद्ध कारवाई करण्याबाबत सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम त्याला इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करावे, अशीही मागणीही विखे-पाटील यांनी केली. मुन्ना यादववर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. अन्यथा त्याला मुख्यमंत्र्यांचे संरक्षण आहे, असे आम्ही समजू, असेही त्यांनी सांगितले.

 

नागपूर पोलिसांना मुन्ना यादव सापडत नसेल तर त्यांनी त्याला फरार घोषित करावे. त्याला पकडण्यासाठी 50 हजारांचे बक्षीस जाहीर करावे. बक्षीसाची रक्कम द्यायला आपण तयार असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

नागपूरसह राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर विखे-पाटील बोलत होते. मुन्ना यादव नागपूरातच असून त्याला विक्की कुकरेजा यांनी फार्म हाऊसमध्ये आश्रय दिला आहे. तो तिथून फरार होण्याची शक्यता असून पोलिसांनी विक्की कुकरेजा यांची सखोल चौकशी करावी. आठवडाभरातील त्यांचे मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्स तपासावे. पोलिसांना मुन्ना यादवचे धागेदोरे मिळतील, असा सल्ला विखे-पाटील यांनी दिला आहे.

 

दरम्यान, नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी राष्ट्रभाषा प्रचार सभेला 155 कोटींची शुल्कमाफी कशी दिली? हा मोठा घोटाळा, त्यांना बडतर्फ कर; अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा.. गुंडांना पाठाशी घालण्याचे सरकारचे धोरण...

 

बातम्या आणखी आहेत...