आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात संघाची अखिल भारतीय प्रातिनिधिक सभा, शहा, तोगडियांची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नागपूरमध्ये संघ मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रातिनिधिक सभेला सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सभेची सुरुवात सकाळी साडे आठ वाजता सुरू झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दरवर्षी होणाऱ्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होत असते. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक समजली जाते. राजकारणासह संघाच्या कामाची दिशा कशी राहणार याबाबत याठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित शहा आणि प्रवीण तोगडियाही सकाळीच याठिकाणी पोहोचले आहेत. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही अखिल भारतीय प्रातिनिधिक सभा दरवर्षीच आयोजित करण्यात येत असते. दर तीन वर्षांनी नागपूर येथे या सभेचे आयोजन केले जात असते. सभेत दीड हजाराहून अधिक स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. या सभेसाठी संघाचे देशभरातील संघाचे स्वयंसेवक आणि त्याचबरोबर भाजपचे अनेक मोठे पदाधिकारी आणि नेते या सभेसाठी नागपुरात येणार आहेत. त्यामुळे नागपुरात तीन दिवस राजकीय सेलिब्रिटींची वर्दळ असणार आहे. 


सरकार्यवाहांची निवड 
संघाच्या या अखिल भारतीय प्रातिनिधिक सभेत संघाच्या सरकार्यवाहांची निवड होत असते. त्यासाठीच्या निवडणुकीची तयारीही करण्यात आली आहे. पण सध्याचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचीच पुन्हा निवड होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. 


तोगडिया भाजप यांच्यातील तणाव
विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडियादेखिल या बैठकीसाठी नागपुरात आलेले आहेत. बैठकीत जाण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रवीण तोगडिया म्हणाले की, माझ्या गाडीवर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला, मला मारण्याचा प्रयत्न झाला. पण मला काहीही बोलायचे नाही संघाचे पदाधिकारी याबाबत बोलतील. गेल्या काही दिवसांत तोगडिया आणि भाजपमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रकरणावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...