आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीतही सत्तेची सूत्रे भ्रष्ट लोकांकडे; न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांचे परखड मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर-  देशात लोकशाही व्यवस्था असली लोकशाही पुढील मर्यादा, राजकीय प्रभाव, अनावश्यक हस्तक्षेपामुळे  सत्तेची सूत्रे भ्रष्ट लोकांच्याच हाती जातात, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी शनिवारी नागपुरात बोलताना आपली नाराजी प्रकट केली. भ्रष्ट राजकारण्यांवर नियंत्रण आवश्यक आहे. त्यासाठी  आगामी पिढ्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी देशातील न्यायव्यवस्था स्वायत्त आणि प्रभावी असणे गरजेचे आहे. कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्था टिकवून ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वकिलांची आहे,  असा सल्लाही न्या. चेलमेश्वर यांनी या वेळी दिला.  हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने  आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.


“रूल ऑफ लॉ अँड रोल ऑफ द बार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा  विषय होता. व्यवस्था सक्षम नसेल आणि न्यायव्यवस्था स्वायत्त आणि प्रभावी नसेल तर देशात कुणीही सुरक्षित राहणार नाही, असा इशारा देऊन ते म्हणाले, नागरिकांना सन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी न्यायव्यवस्था महत्त्वाचा पर्याय आहे. कायदे अस्तित्वात असले तरी त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतूनच कायद्याचे राज्य निर्माण होते. यामुळे लोकांनीही कायद्याचे बंधन पाळणे आवश्यक आहे.  तपास यंत्रणा त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत नाही.  राजकीय दबाव, वेळोवेळी लागणारे  बंदोबस्त आणि दैनंदिन व्यस्ततेतून वेळ मिळाला तरच तपास अधिकारी योग्य पद्धतीने तपास करू शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...