आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्वाभिमानी\' ने फोडला नागपूरला जाणारा दुधाचा टँकर, भविष्यात मंत्र्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - येथील वरुड परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरला जाणारा दुधाचा टँकर फोडवून पेटवून दिला. दुधाला 5 रुपये प्रतिलीटर अनुदान द्या आणि प्रत्येक तालुक्यात मदर डेअरी केंद्र सुरू करा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 

 

महाराष्ट्रामध्ये दररोज 20 लाख लीटर अतिरिक्त दुध उत्पादन होते. याची योग्य विल्हेवाट लावली तर दुध खरेदीचा भाव 27 ते 28 रूपयापर्यंत जाऊ सकतो. त्यासाठी सरकारने दररोज 20 लाख लीटर दूध स्वत: खरेदी करावी. यासह इतरही अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानीचे विदर्भप्रमुख देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...