आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या पीडितेला गर्भपाताची परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नागपूर- बलात्काराच्या घटनेतून तीन महिन्यांची गर्भवती राहिलेल्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील १९ वर्षीय तरुणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा देत गर्भपात करण्याची परवानगी दिली. 

  
न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि अरुण उपाध्याय यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना अशा घटनांमध्ये पीडितांना देण्यात येणारी नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही सरकारला दिले आहेत. पीडिता ही बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असून ती मानसिक आजारी आहे. पूर्वी तिचा विवाहदेखील झाला होता. मात्र, काही महिन्यातच पतीने तिला सोडून दिले होते. त्यामुळे ती आई आणि लहान भावासह राहत होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या प्रभाकर सारंग गायकवाड याने ती घरी एकटी असल्याचे पाहून तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने आईने तिला डॉ. संध्या कोठारी यांच्याकडे नेले होते. डॉक्टरांनी तरुणी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. आईने विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यावर अत्याचाराची माहिती दिली. आईच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी याप्रकरणी गायकवाडविरोधात गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर पीडितेच्या आईने मुलीच्या गर्भपातासाठी बुलडाणा येथील न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जाण्याचा सल्ला पीडितेला दिला. त्यामुळे कायदे सल्लागार मंडळामार्फत या प्रकरणात अॅड. भाटिया यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


अहवालानंतर परवानगी
१६ एप्रिल रोजी पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर वैद्यकीय मंडळाने गर्भपात करता येईल, असा अहवाल न्यायालयास दिला होता. त्या आधारे उच्च न्यायालयाने गुरुवारी गर्भपात करण्याची परवानगी दिली. त्यासाठी २१ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. राज्य शासनाच्या वतीने अॅड. निवेदिता मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने कठाेर शिक्षा करावी, अशी मागणी पीडित तरुणीच्या आईने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...