आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत तेल रिफायनरीतील टाक्यात बुडून तिघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो... - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो...

अमरावती- अमरावती-बडनेरा जुना बायपासवरील एमआयडीसीमध्ये असलेल्या भुवनेश्वरी तेल रिफायनरी कारखान्यातील एका अशुद्ध पाण्याच्या टाक्यात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, ३ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. 


दिलीप मनोहरपंत देवरणकर (५८ रा. उषा कॉलनी, साईनगर) प्रवीण गुलाबराव चौधरी (५०) आणि वैभव देविदासराव नेवारे (२७ दोघेही रा. जुनी वस्ती बडनेरा) अशी मृतकांची नावे आहेत. देवरणकर हे वायरमन, चौधरी ऑपरेटर, तर नेवारे मदतनीस म्हणून कार्यरत होते. हा कारखाना २७ फेब्रुवारीपासून बंद होता. शनिवारी कारखाना पुन्हा सुरू झाला. रात्रीला तिघेही कारखान्यातील मागील बाजूला असलेल्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून बाहेर सोडण्याच्या पाण्याच्या टाक्यात मृतावस्थेत आढळून आले. टाकीत असलेली इलेक्ट्रिक मोटर दुरुस्तीसाठी हे तिघेही गेले व विद्युत झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस आयुक्त दतात्रय मंडलिक, पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, राजापठचे एसीपी सुनील सोनवणे, राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम व ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. मृतदेह टाक्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. 


टाक्यात होते दीड ते दोन फूट पाणी 
सदर कामगार कारखान्यातील ज्या टाक्यात पडले होते. त्या टाक्यात जेमतेम दीड ते दोन फूट अशुद्ध पाणी होते. त्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला किंवा विद्युत स्पर्शाने हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...