आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOMAN'S DAY SPECIAL: विदर्भातील या रेल्वे स्थानकावर आता येणार महिला राज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माटुंगा रेल्वे स्थानकाच्या नियंत्रण कक्षात तैनात असलेली महिला कर्मचारी. - Divya Marathi
माटुंगा रेल्वे स्थानकाच्या नियंत्रण कक्षात तैनात असलेली महिला कर्मचारी.

नागपूर- उपराजधानीतील अजनी रेल्वे स्थानकावर आता कायमस्वरूपी महिला राज येणार आहे.
रेल्वे व्यवस्थापकापासून सफाई कर्मचाऱ्यापर्यंत सर्व कारभार महिला पाहणार आहेत. जागतिक महिला दिनापासून उपक्रमाची सुरवात होणार आहे. यापूर्वी मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकावर या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

 

 

देशातील पहिले 'लेडिज स्पेशल' रेल्वे स्टेशन माटुंगा हे आहे. त्यापाठोपाठ आता उपराजधानीतील अजनी रेल्वे स्थानकावरही महिला राज येणार आहे.  

 

 

महिला सशक्तीकरणासाठी रेल्वेने उचलेले पाऊल
- माटुंगा रेल्वे स्टेशनवर जवळपास 34 महिला कर्मचारी आहे. यात 11 बुकिंग क्लार्क, 7 टीसी, 2 चीफ बुकिंग अॅडव्हायझर, 5 रेल्वे पोलिस कर्मचारी, 5 पॉईंट पर्सन, 2 उद्घोषक आणि एक स्टेशन व्यवस्थापक यांचा समावेश आहे.

- रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे महिला सशक्तीकरणाकरित उचलेले पाऊल आहे. आमचे काही पॅसेजर रिजर्वेशन सेंटर आणि उपनगरीय रेल्वेची टिकटिंग सिस्टिम पुर्णपणे महिला सांभाळतात. त्यानंतर निर्णय घेण्यात आला की एक पुर्ण रेल्वे स्टेशन महिलांना सोपविण्यात यावे. 
- 6 महिन्यापूर्वी करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता आणखी काही रेल्वे स्थानके महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

 

 

या कारणामुळे बनले लेडिज स्पेशल स्टेशन
- माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ अनेक महाविद्यालये आहेत. स्थानकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच जास्त आहे. रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यासाठी अनेक महिला कर्मचाऱ्यांची माटुंगा स्थानकावर बदली करण्यात आली.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...