आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्याचा खून केल्याचे प्रकरण; माजी आमदार पटेल, कार्यकर्ते, ग्रामस्थांवरही गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- सख्या चुलत्यानेच पुतण्याची फरशाने गळा चिरून हत्या केल्यानंतर खारी येथील संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांशी जमावाचा संघर्ष झाल्याने त्यात ठाणेदारासह एक पोलिस शिपाई जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यावर जमावाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली रविवारी गुन्हा दाखल केला. 


पटेल यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होताच पटेल, कार्यकर्ते भूमिगत झाले, दुसरीकडे पुतण्याची हत्या संपत्तीच्या वाद वैमनस्यातून केली असून भविष्यात सख्खा भाऊच माझा टार्गेट आहे, असे आरोपी धन्नालाल येवले याने पाेलिसांना सांगितल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि सविता वड्डे यांनी दिली. पटेल तसेच मृतक बालकाचे वडील वासुदेव श्यामलाल येवले आई माया वासुदेव येवले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले पवन सदाशिव टोंगडे (१०), राज मिश्रीलाल कापसे (१२) युवराज सदाशिव टोंगडे (अडीच वर्षे) यांच्यापैकी पोलिसांनी पवन राज यांचे बयान नोंदवले आहे. याशिवाय मंदिर परिसरातच असलेला राजचा भाऊ राहुलचेही पोलिसांनी बयान नोंदवले. 

बातम्या आणखी आहेत...