आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: पारा घसरला 7.9 वर, शहर गारठले; गेल्या वर्षी आजच्या दिवशी होते 8.5 अंश सेल्सिअस तापमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थंडीचा जोर वाढल्याने शहरासह जिल्ह्यात शेकोट्या पेटल्या आहेत. छाया:मनीष जगताप - Divya Marathi
थंडीचा जोर वाढल्याने शहरासह जिल्ह्यात शेकोट्या पेटल्या आहेत. छाया:मनीष जगताप

अमरावती- ढगांनी काढता पाय घेतल्यामुळे तसेच उत्तरेकडून गार वारे वाहत असल्याने थंडीच्या कडाका चांगलाच वाढला असून, शहर गारठले अाहे. आज पारा ७.९ अंशापर्यंत खाली घसरला. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान होय. गेल्या वर्षी आजच्या िदवशी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच ७.९ अंश सेल्सिअस हे गेल्या वर्षीचे सर्वात कमी तापमान होते, म्हणजे आजच्या पेक्षा केवळ ०.१ अंशाने ते कमी नोंदवण्यात आले होते. 


शासकीय कार्यालयांमध्येही काम चांगलेच थंडावले होते. थंडीसह सुट्यांचा हँगओव्हर कायम होता. ऊब िमळावी म्हणून लोक वारंवार उन्हात येत होते. चहासह काॅफीला िदवसभरात मागणी वाढली. ऐरवी एक कप चहा पुरेसा असतो पण आज थंडी कमी करण्यासाठी िदवसातून तीन ते चार कप जास्तच चहा घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 


याआधी शहराच्या इतिहासात ११ जाने. २०११ रोजी ४.९ अशी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. त्याआधी नंतर आजवर पारा ५.५ अंशाच्या खाली घसरला नसल्याची माहिती जल विज्ञान प्रकल्पाद्वारे दिली. अमरावतीत १५ डिसें. ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कडाक्याची थंडी असते. यादरम्यान जानेवारीत तापमान हे सरासरी अंश सेल्सिअसच्या आसपास असते. उत्तरेकडून थंड वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने यंदा १८ डिसे. पासून थंडीने जोर धरण्यास सुरुवात केली असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज श्री शिवाजी कृषी हवामान खात्याने वर्तवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...