आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- व्हॅलेंटाइन डेला पत्नी किंवा प्रेयसीला सिनेमाला किंवा फिरायला घेऊन जाणारे अनेक असतात. मात्र शहरात काही दाम्पत्य असेही आहेत, जे प्रेमदिनाचे अौचित्य साधून गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने रक्तदान करीत प्रेमाचा अनोखा संदेश देत आहेत. रक्तदान समितीच्या वतीने स्व. मधुसुदनजी जाजोदिया यांच्या स्मृतीत व्हॅलेंटाइन डेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. २००६ पासून या उपक्रमांतर्गत १३ वेळा रक्तदान केलेल्यांमध्ये सुनील व राधा अग्रवाल, तुषार व तेजस्विनी बापट, महेंद्र व सरला भुतडा , अजय व भारतीय दाताेराव, प्रमोद व उर्वशी शर्मा, उमेश व स्वपना पाटणकर, पुरुषोत्तम व रेखा कासट, मनीष व शैलजा काळमेघ आदींचा समावेश आहे.
संजय व सारिका पाटील
अमरावती ज्युडो असोसिएशनचे सहसचिव व व्यावसायिक ५२ वर्षीय संजय पाटील हे पत्नीसह १२ वर्षांपासून रक्तदान करीत आहेत. पत्नी सारिका यांनी पतीजवळूनच प्रेरित होत रक्तदानासाठी पुढाकार घेतला. एका बाळंतिणीचे रक्तदानामुळे प्राण वाचवले.
उदय व रुपल श्रॉफ
५५ वर्षीय उदय श्रॉफ हे खासगी कंपनीत नोकरी करतात, तर पत्नी रूपल गृहिणी आहेत. ३० वर्षांपासून श्रॉफ हे स्वयंस्फूर्तीने विविध कार्यक्रमांत वैयक्तिकरीत्या रक्तदान करतात. रुपल पतीसह १३ वर्षांपासून रक्तदान करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांची प्राध्यापक असलेली मुलगी, पलक ही देखील काका व पालकांपासून प्रेरित झाली.
प्रवीण व पूजा भंसाळी
४७ वर्षीय प्रवीण भंसाळी हे मागील २५ वर्षांपासून रक्तदान करीत आहेत. मात्र २००६ पासून ते पत्नी पूजासह रक्तदान करतात. पूजा या गृहिणी असून पतीपासून प्रेरीत होत रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. ७ वर्षांपूर्वी एका बाळांतीणीला रक्त देऊन जीवनदान दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.