आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यावसायिकाच्या घरातून देशी कट्टा, 2 रायफली, 6 जिवंत काडतूस जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा-अमरावती- तिवसा येथील सातरगाव मार्गावरील विद्युत कॉलनीमध्ये राहणाऱ्या विजय ऊर्फ अण्णास्वामी रमेशपंत वाठोडकर (वय ४२) या व्यावसायिकाच्या घरातून पोलिसांनी एका देशी कट्ट्यासह दोन रायफली (भरमार)व ६ जिवंत काडतूस जप्त करून वाठोडकरला सोमवारी (दि. २३) रात्रीच अटक केली आहे. घरात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र साठा मिळून आल्याने केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


वाठोडकरच्या घरी बेकायदेशीर शस्त्र असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तिवसाचे ठाणेदार सतीश जाधव यांच्या नेतृत्वात वाठोडकरच्या घरी सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास धाड टाकण्यात आली. यावेळी घरातच एका भिंतीवर एक रायफल लटकलेली होती. त्यामुळे पोलिसांना असलेली माहिती खरी असल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी घराची झडती अधिक गंभीरपणे घेतली. त्यावेळी भितींला विशिष्ट पद्धतीने खचका तयार करून त्याला दोन भरमार रायफल लटकवलेल्या दिसल्या. तसेच कपाटाच्या आतील लॉकरमध्ये एक देशी कट्टा मिळून आला. त्याच ठिकाणी देशी कट्ट्यासाठी वापरण्यात येणारे सहा जिवंत काडतूस व काही रिकामी काडतुस पोलिसांना दिसली. त्यामुळे पोलिसांनी दोन भरमार रायफलसह देशीकट्टा व काडतूस जप्त केली.. गैरकायदेशीर रायफली व देशी कट्टा घरात सापडल्याने पोलिसांनी वाठोडकरला घरातूनच अटक केली. आरोपी विरुद्ध पोलिसांनी शस्त्र अधिनियम १९५९ नुसार कलम ३,२५ व १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शीतल खोब्रागडे, अमोल ढोकणे, मिनेश खांडेकर, मोहसीन शहा यांनी केली. 


देशीकट्टा आला मध्यप्रदेशातून 
वाठोडकर यांचे तिवस्यात ड्रायव्हिंग स्कूल असून,त्याच्या मागील बाजूलाच त्याचे घर आहे. याच घरातून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला आहे. याच साठ्यामध्ये पोलिसांनी सहा जीवंत काडतूसं तसेच देशी कट्टा जप्त केला आहे. हा कट्टा मध्यप्रदेशातून आणल्याचे त्याने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले आहे. तसेच एक भरमार वर्धेतून आणल्याचेही सांगितले आहे. 


भरमार रायफल आल्या कुठून 
पोलिसांनी जप्त केलेल्या दोन भरमार रायफलपैकी एक भरमार रायफल अति प्राचीन काळातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही भरमार रायफल कुठून आणल्यात याबाबत पोलिस तपास करत आहे. 


सखोल तपास करणार 
वाठोडकरच्या घरातून एक देशीकट्टा,२ भरमार रायफल व सहा जीवंत काडतूस जप्त केलेत. सदर शस्त्र वेगवेगळ्या ठिकाणाहून आणल्याचे त्याने सांगितले आहे. त्याला २६ पर्यंत कोठडी मिळाली. सखोल तपास केला जाईल.
- सतीश जाधव, ठाणेदार, तिवसा.

बातम्या आणखी आहेत...