आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन महिला घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्याची घटना भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील खरबी येथे घडली.

 

बुधवारी रात्री ही घटना घडली. दुर्गा वैकुंठी आणि ज्योती गिरी अशी या मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. दुचाकीवर या दोन महिलांसह एकूण चार जण बसले होते. ट्रकची धडक लागल्याने या महिला खाली पडून ट्रकच्या चाकांखाली आल्या व घटनास्थळीच मरण पावल्या.तर दुचाकीचालक व एक मुलगी गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मोहाडी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. अपघातास दुचाकीचालकही तेवढाच जबाबदार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...