आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पाल्यांना उच्च शिक्षणासाठी 25 हजार अनुदान, 50 हजारांचे बिनव्याजी कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पोलिस दलात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवी, अायअायटी, एलएलएम अादी उच्च शिक्षणासाठी ५० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज व २५ हजारांचे सानुग्रह अनुदान पाेलिसांच्या कल्याण शाखेतर्फे देण्यात येणार आहे. मात्र या पाल्यांचा अभ्यासक्रमासाठी  प्रवेश व्यवस्थापन काेट्यातून झालेला नसावा, अशी अट त्यासाठी घालण्यात अाली अाहे.    


दरम्यान, सानुग्रह अनुदान केवळ प्रवेश घेतलेल्या एकाच वर्षी मिळणार अाहे, तर ५० हजारांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज संबंधित पाल्यांना टप्प्याटप्प्याने परत करावे लागेल. या मदतीमुळे पोलिसांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी काही प्रमाणात का होईना अार्थिक पाठबळ मिळण्यासाठी मदत होणार आहे. या योजनेमधून ज्या पाेलिसांना अर्थसाहाय्य घ्यायचे असेल त्यांनी पाल्यांचा प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवेश घेतल्याबाबतचे संबंधित महाविद्यालयाची कागदपत्रे व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांद्वारे पोलिस आयुक्तांच्या नावाने अर्ज करावा. त्यांची मंजुरी मिळताच एक ते दोन आठवड्यांत संबधित पोलिस कर्मचाऱ्याला ही मदत देण्यात येणार आहे. 

 
पाेलिसांच्या कल्याण शाखेकडून विविध प्रकारच्या आरोग्य, शैक्षणिक याेजना राबवण्यात येतात. यामध्ये पाल्यांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या पोलिस पाल्यांसाठी सानुग्रह अनुदानाची तरतूद आहे. यासह आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी आम्ही दोन हजार माहितीपुस्तके प्रकाशित करत आहोत. या पुस्तकात सविस्तर माहिती असेल, अशी माहिती पाेलिस अायुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली.  

 

गर्भवती महिला पोलिसांनाही ५ हजार
पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या महिला कर्मचाऱ्यांना कल्याण शाखेतर्फे  पाच हजार रुपयांची अार्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच या महिला पाेलिसाला मुलगी झाल्यास अाणखी पाच हजार रुपये भेट स्वरूपात दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...