आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 81 बोगस डॉक्टर; 24 डॉक्टरांवर गुन्हे दाखल; डॉ. दीपक सावंत यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- रुग्णालयातील कामाचा अनुभव घेऊन किंवा बोगस पदवी घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरोधात सरकारने गंभीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तपासणीत राज्यात ८१ बोगस डॉक्टर आढळून आले असून २४ डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २७ दवाखाने बंदही करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी उत्तरात दिली आहे. मेधा कुलकर्णी यांनी राज्यातील रुग्णालयांच्या केलेल्या तपासणीची माहिती तारांकित प्रश्नाद्वारे मागितली होती. 


म्हैसाळ प्रकरणानंतर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरांवर राज्यातील सर्व ३७,०६८ वैद्यकीय संस्थांची १५ एप्रिल ते ३१ मे २०१७ मध्ये तपासणी केली. यात ६७४२ केंद्र वा रुग्णालयांत विविध कायद्यानुसार त्रुटी आढळून आल्या. २०८४ वैद्यकीय संस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन केले नसल्याचे आणि  ८१ बोगस डॉक्टर आढळून आले. समितीने शिफारस केल्यानुसार महाराष्ट्र प्रॅक्टिकल ॲक्ट कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २० बोगस डॉक्टर, २ बॉम्बे नर्सिंग होम, १ क्रॉस पॅथी, १ फायर रेग्युलेशन अशा २४ डॉक्टरांवर गुन्हा नोंदवण्यात आला. उर्वरित प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत नोटीस देण्यात आली. दोषी आढळलेल्या १६९ वैद्यकीय संस्थांना दंड करण्यात आला असून २७ दवाखाने बंद करण्यात आले आहेत. वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ चे उल्लंघन केल्यामुळे ४ केंद्रे बंद करण्यात आली आहेत आणि ५ सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत. ३ वैद्यकीय संस्थांना ताकीद देण्यात आली आहे तसेच ५ प्रकरणे पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्याचेही लेखी उत्तरात सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...