आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही जनजागृती : 'अारटीओ' ने दिले नवरदेवाला हेल्मेट'गिफ्ट'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सद्या आरटीओचा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांची जागृती करण्यासाठी आरटीओ अधिकारी कर्मचारी प्रयत्नरत आहे. दरम्यान, दुचाकी चालवताना चालकाने हेल्मेट वापरायलाच पाहिजे, असा संदेश देण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी एका लग्नात जावून चक्क नवरदेवाला हेल्मेटच भेट दिले आहे. तसेच जिल्ह्यातील इतर भागात जावून काही दुचाकीस्वारांना हेल्मेट भेट देवून प्रत्येक दुचाकीस्वाराने 'हेल्मेट' वापरायला पाहिजे, असे आवाहन 'आरटीओ'कडून करण्यात येत आहे. 


वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी पारंपारिक पद्धतीसोबत यावर्षी काही नवीन प्रयोग आरटीओकडून सुरू आहेत. दरम्यान, दर्यापूर येथील मोहसीन नामक युवकाचा 'निकाह' होता. यावेळी आरटीओचे अधिकारी त्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी सहायक आरटीओ प्रसाद गांजरे व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोहसीन यांना 'हेल्मेट' भेट दिले. यावेळी याच कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश भारसाकळे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते, रोहीत काटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मोहसीन यांना 'हेल्मेट' भेट देण्यामागची भूमिका सहायक आरटीओ प्रसाद गांजरे यांनी सांगितली की, नवरदेवाला इतर काही वस्तू भेट देण्याऐवजी 'हेल्मेट' भेट दिल्यामुळे कार्यक्रमात इतर उपस्थितांना त्यापासून प्रेरणा मिळू शकते, तसेच प्रत्येक दुचाकीस्वाराने 'हेल्मेट'चा वापर करायलाच पाहिजे, असा संदेशही त्यामाध्यमातून देता आला आहे. दरम्यान, यासोबतच सप्ताहाच्या उर्वरित दिवसात आम्ही जिल्ह्यातील विविध भागात जावून काही दुचाकीस्वारांना 'हेल्मेट' भेट देणार आहोत. प्रत्येक दुचाकीस्वाराला 'हेल्मेट' देणे शक्य नाही मात्र ज्यांना देवू त्यांच्यासोबत इतरही दुचाकीस्वारांनी 'हेल्मेट' चा वापर करावा, असा संदेश आम्ही त्याद्वारे देणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. 


काही दुचाकीस्वारांना आम्ही देणार 'हेल्मेट' 
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ग्रामीण भागातील काही दुचाकीस्वारांना आम्ही 'हेल्मेट' देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना आम्ही 'हेल्मेट' देवू त्यांनी तर 'हेल्मेट'चा वापर करावाच त्याचबरोबर इतर दुचाकीस्वारांनीही 'हेल्मेट'चा वापर केला पाहीजे, असे आवाहन आम्ही करणार आहोत. विजय काठोडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी. 

बातम्या आणखी आहेत...