आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: पोलिसांच्या हातून आरोपी पळाला; एका तासानंतर पुन्हा पकडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- चांदूर बाजार येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका आरोपीला कारागृहात टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे एक पोलिस जमादार सदर आरोपीला घेऊन अमरावती कारागृहाजवळ पोहचले. याचवेळी आरोपीने त्या जमादाराला चकमा देऊन पोबारा केला. मात्र त्यानंतर अवघ्या एका तासातच सदर आरोपीला बसस्थानक परिसरातील एका देशी दारुच्या दुकानातून पकडण्यात आले. हा प्रकार बुधवारी (दि. २०) रात्री घडला आहे. अ. तारिक ऊर्फ राजा अ. सलाम सौदागर (२४, रा. पुर्णानगर) असे पोलिसांच्या हातातून पळालेल्या आरोपीचे नाव आहे. 


राजाविरुध्द आसेगाव पाोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला अटक करून बुधवारी चांदूर बाजार येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (क्रमांक ३) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने राजाला कारागृहात टाकण्याचे अादेश दिले. त्यावेळीे आसेगाव ठाण्याचे हवालदार प्रविण मेटांगे (ब. न. ४७८) सदर न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राजाला घेऊन मेटांगे सायंकाळी अमरावतीसाठी निघाले. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपीला घेवून मेटांगे कारागृहाजवळ पोहचले. त्याचदरम्यान राजाने मेटांगे यांना चकमा देवून पळाला.तो पसार झाल्याचे लक्षात येताच मेटांगे यांनी त्याचा पाठलाग केला. तो थेट बसस्थानक भागातील एकादेशी दारु दुकानात पोहचला होता.

 

त्याचठिकाणी त्याला मेटांगे यांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पकडून बसस्थानकातील पोलिस चौकीत आणले व सदर हकिकत पोलिसांना सांगितली. तसेच ही माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ वाहन पाठवून राजाला फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वााधिन केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रवीण मेटांगे यांच्या तक्रारीवरून अ. तारिक ऊर्फ राजाविरुध्द कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आराेपी पसार होण्याच्या या घटनेमुळे आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस बळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिल्या जात आहे. 


कडेकोट बंदोबस्तात केले न्यायालयात हजर 
राजाने बुधवारी रात्री पोलिसाला चकमा देवून पोबारा केला होता. त्यामुळे गुरूवारी (दि. २१) त्याला न्यायालयात हजर करताना पुरेशी खबरदारी घेवून कडेकोट बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर केले असल्याची माहिती फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...