आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणा ‘जेसीबी’च ठरला अजगरासाठी जीवनदाता; पाईपात अडकलेला अजगर काढला बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- भातकुली तालुक्यातील बोरगावनजीक खोदकाम सुरू आहे. हेच काम सुरू असताना जमिनीत असलेला एक सिमेंट पाईप जेसीबीने खोदून किंवा फाेडून काढण्यात येणार होता. त्याचवेळी गावातील काही युवकांना लक्षात आले की, जो पाईप फोडला जाणार आहे. त्याच पाईपमध्ये दहा फुटाचा अजगर आहे. त्यामुळे गावातील युवकांनी शहरातील ‘वसा’ संस्थेच्या सर्पमित्रांना माहीती दिली. ‘वसा’च्या सदस्यांनी त्या ठिकाणी जावून ज्या जेसीबीने पाईप फोडल्या जाणार होता, यामध्ये कदाचित अजगराचा जीवसुध्दा जाऊ शकला असता त्याच जेसीबीच्या मदतीने पाईप अलगद काढून अजगराला जीवदान दिले आहे. दरम्यान आवश्यक प्रक्रीयेअंती वनविभागाच्या मदतीने ‘वसा’च्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. २८) या अजगराला सुरक्षित ठिकाणी सोडले आहे. 


बोरगावनजीक तलावासाठी जेसीबीच्या सहायाने खोदकाम सुरू होते.तेथे अजगर असल्याची माहीती मिळताच वसाचे शुभम सांयके, भुषण सांयके मुकेश मालवे यांना दिली. ते तातडीने गावात गेले. जेसीबीच्या मदतीने पाईप अलगद काढण्यात आला नंतर त्यामधून अजगराला बाहेर काढण्यात आले. वेळीच लक्षात आले नसते तर ज्या जेसीबीच्या मदतीने अजगर बाहेर काढण्यात आला, तोच जेसीबी अजगरासाठी काळ बनला असता. सर्पमित्रांनी सदर अजगराची माहीती वनविभागाला दिली. त्यानंतर अजगराला अमरावतीला आणले पशु शल्यचिकीत्सकांनी अजगराची तपासणी केली. अजगर सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने आवश्यक प्रक्रीया पुर्ण केली. तसेच शुक्रवारी वसाचे सर्पमित्र रोहीत रेवाळकर, गणेश अकर्ते, भुषण हंगरे यांच्याकडे दिला. 


सोशल मिडीयाने वाचवले अजगराचे प्राण! 
वर्षभरापुर्वीशहरातील विसावा कॉलनीमध्ये नालीचे खोदकाम सुरू होते. यावेळी बिळात असलेले तीन अजगर जेसीबीच्या धक्क्याने जखमी झाले होते. त्यापैकी दोन अजगरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सदर घटना सर्पमित्रांनी सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. हीच माहिती बोरगावच्या युवकांनी वाचली होती त्यामुळेच त्यांनी वेळीच जेसीबीचे काम थांबवून वसाच्या सदस्यांना माहिती दिली. 

बातम्या आणखी आहेत...